96th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan, Thane 2016

96th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan, Thane 2016

1767 17 Media/News Company

2225453489 natyaparishadthane@gmail.com www.natyaparishadthane.com

मच्छिंद्र कांबळी तालीम हॉल, राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ मूस रोड, ठाणे (प)-२, Thane, India - 400602

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

17 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About 96th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan, Thane 2016 in मच्छिंद्र कांबळी तालीम हॉल, राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ मूस रोड, ठाणे (प)-२, Thane

९६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी ते रविवार दि. २१ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ठाण्यामध्ये होणार आहे.

यापूर्वी ठाणे जिल्ह्यात, कल्याण (१९७२), वाशी (१९९२), वसई (२००२) आणि डोंबिवली (२००४) अशी नाट्यसंमेलने झाली असली तरी ठाणे महानगराला हा मान प्रथमच मिळाला आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची यापूर्वीच निवड जाहीर झाली असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे असणार आहेत.

हे संमेलन अधिक व्यापक व्हावे या दृष्टीकोनातून जिल्ह्यातल्या सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषदांचे महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त तसेच ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांसह, ठाणे महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आयोजन समितीत सहभागी केले जाणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सायं. ७ वाजता शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होईल. त्याआधी नाट्य कलावंत, कलापथक, रसिक प्रेक्षकांचा सहभाग असलेली नाट्यदिंडी काढण्यात येईल.

भव्य उद्घाटन आणि समारोप सोहळा, संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांची प्रकट मुलाखत, नाट्य, चित्रपट आणि मालिकांमधल्या वलयांकित कलावंतांचा सहभाग असलेली कलावंत रजनी, महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धांमधून विजेत्या ठरलेल्या एकांकीकांपैकी निवडक सहा एकांकीकांचा महोत्सव, बालनाट्ये, व्यावसायिक नाटके, परिसंवाद, नाट्यसंगीत आदी विविध कार्यक्रमांनी ठाणे नगरी नाट्यरंगात न्हाऊन निघणार आहे.

संमेलनाच्या निमित्ताने काही वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शने भरवण्यात येणार असून त्यात स्व. के. टी. देशमुख संग्रहालयाच्या वतीने रंगभूमीच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन, तसेच नाटककार आणि ज्येष्ठ रंगकर्मींच्या सह्यांच्या प्रदर्शनांचा समावेश आहे. ठाण्याच्या रंगभूमीची आणि रंगकर्मीची माहिती देणारी एक स्मरणिका देखील प्रकाशित होणार आहे.

संमेलनाचे कार्यक्रम दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह तसेच टाऊन हॉल खुला रंगमंच इथे होणार आहेत. तसेच मो. ह. विद्यालय खुल्या रंगमंचावर संमेलनपूर्व कार्यक्रम होणार आहेत.

Popular Business in thane By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.