Tata Ganapati पूर्व विभाग प्रमुख मानाचा : ताता गणपती

Tata Ganapati पूर्व विभाग प्रमुख मानाचा : ताता गणपती

209 20 Hindu Temple

info@tataganapati.com www.tataganapati.com

266/18 Ravivar Peth, Bhadravathi Peth, Solapur, Maharashtra 413005, Solapur, India - 413005

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
5

20 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Tata Ganapati पूर्व विभाग प्रमुख मानाचा : ताता गणपती in 266/18 Ravivar Peth, Bhadravathi Peth, Solapur, Maharashtra 413005, Solapur

ताता गणपती सांस्कृतिक मंडळ च्या अधिकृत फेसबुक पृष्ठ वरती आपले सहर्ष स्वागत करत आहोत.

सोलापूर शहरातील पूर्व भागात प्रमुख व अत्यंत मानाचे असे ताता गणपतीला खूप महत्व आहे. शहरातील नामवंत उद्योगपती श्री मुरलीधरशेठ आरकाल व श्री विजयकुमार द्यावरकोंडा हे मंडळाचे सर्वेसर्वा आणि आधारस्तंभ आहेत. ताता गणपती सांस्कृतिक मंडळाची स्थापना 1980 साली सोलापुरात झाली. त्यावेळी सोलापुरातील प्रतिष्ठित उद्योजक आरकाल बंधू व परिवार यांनी वडील कै. आशय्या आरकाल यांच्या स्मरणार्थ मंडळाला 6 फूटी "श्रीं" ची सुंदर मूर्ति दिली. ताता गणपतीची ही सुंदर मूर्ति कलाशिक्षक डोंगे यांनी फाइबर पासून तयार केली आहे. त्यानंतर कालमानाप्रमाणे भविकांच्या मनात ताता गणपतीबद्दलची श्रद्धा उत्तरोत्तर वाढत गेली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत ताता गणपतीला चांदीची आभूषणे, दागदागिने, शस्त्र, उत्सवमूर्ति वाहन, पादुका, मूषक असे भाविकांनी भेटीदाखल दिले आहेत. भक्तांनी सढळ हाताने "श्रीं" ना अर्पण केल्यामुळे आज मंडळाकडे जवळपास 45 किलो चांदीची आणि 400 ग्राम आभुषणे आहेत.

उत्सवकाळात विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मंडळ सर्व गणेश भक्तांच्या चर्चेत राहते. आजपर्यंत ताता गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राजकीय, शासकीय, उद्योग, क्रीडा, सिनेकलाकार, वैद्यकीय असे सर्वच स्थरातील मान्यवर आलेले आहेत. जसे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर, भूषणकुमार उपाध्याय, पालिका आयुक्त चंद्रकांत गुड़ेवार, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मृणाल कुलकर्णी असे अनेकानेक मान्यवर "श्रीं" च्या दर्शनास आलेले आहेत. येथील विधिवत आणि शास्रोक्त पूजा पद्धती मान्यवरांना भावत असल्याने ते दरवर्षी दर्शन घेण्यास सदैव उत्सुक असतात. गणेशोत्सवच्या काळात पहिल्या दिवासपासून सुंदर आकर्षक देखावा सादर करण्याची मंडळाची प्रथा आहे. उत्कृष्ठतेमुळे सोलापूर पोलिस आयुक्तालयच्या वतीने मंडळाला सलग तीन वेळा " विघ्नहर्ता " पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर मराठी टीवी चैनल अल्फा टीवी च्यावतीने मंडळला सर्वोत्कृष्ट सजावटीसाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि स्टार माझा तर्फे " माझा बाप्पा " प्रथम पुरस्कार मिळालेला आहे.

मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक व क्रीडा उपक्रम राबविले जातात, त्यामध्ये रांगोळी, मेहंदी, चित्रकला,वक्तृत्व , क्रिकेट आणि बुद्धिबळ आदि स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम जसे गणेश जयंती, मार्कंडेय जयंती, स्वातंत्र्य दिवस, गणतंत्र दिवस या कार्यक्रमांचा समावेश आहे. शहरातील विसर्जन मिरवणूक मध्ये सर्वात शेवटी राहण्याचे मान ताता गणपतीला आहे.

राजकीय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक आदी क्षेत्रांत वैशिष्ठयपूर्ण ठसा उमटविल्यामुळे ताता गणपतीला विशेष महत्वाचे स्थान आहे. श्री मुरलीधरशेठ आरकाल यांच्या मार्गदर्शनाने मंडळचे सांस्कृतिक परंपरा अखंडपणे चालू आहे. ताता गणपती सांस्कृतिक मंडळने आपल्या संस्कृतिचे जतन करत सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत गरुडभरारी झेप घेतलेली आहे, त्यामुळे मंडळाचे नाव सर्वदूर पोहोचली आहे.

आपणही आवर्जून श्रीं च्या दर्शनासाठी यावे आणि मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत आपणही सहभागी व्हावे.

Popular Business in solapur By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.