9209228478 nirdharfoundationbase@gmail.com nirdharfoundationb.wixsite.com/nirdharbase

19°27'30.1"N 73°09'08.9"E, Bhiwandi, India - 421302

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
5

2 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Nirdhar Foundation in 19°27'30.1"N 73°09'08.9"E, Bhiwandi

निर्धार फाऊंडेशन बासे

बासे एक डोंगराच्या कुशीत वसलेले १०० ते १२५ घरांचे छोटे गाव परंतु मुख्य रस्त्यापासून दूर असल्याने सरकार दरबारी दुर्लक्षित गाव आणि त्यामुळेच गावातील काही तरुणांनी घेतला गाव विकासाचा ध्यास आणि त्यातूनच जन्म झाला तो निर्धार फाऊंडेशन चा. प्रथम निर्धार ह्या पहिल्या युवा बचत गटाची स्थापना करून नंतर त्याच नावाने NGO ची स्थापना करून त्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजपयोगी व विकासपयोगी कामे कशी करता येतील असा प्राथमिक हेतू अथवा उद्दिष्टे असलेली ही निर्धार फाऊंडेशन.

प्रमुख ध्येय व उद्दीष्टे:
१. परिसरातील गरजू व गरीब लोकांसाठी आरोग्यशिबिरे आयोजित करणे
२. खेड्यातील महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करून स्वावलंबी करणे
३. परिसरातील लोकांना विविध सरकारी योजनांची माहिती देऊन लाभ घेण्यात मदत करणे
४. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वन संरक्षण, वन संवर्धन व वन संगोपन विषयी जनजागृती करणे
५. आदिवासी पाड्यातील लोकांसाठी विविध सरकारी योजना आणून त्यांचा सर्वांगीण विकास करणे
६. भविष्यातील धोके ओळखून अनावश्यक वीजेचा वापर टाळून वीज बचत करणे
७. विविध समाज प्रबोधन पर विषयांवर चित्रपट अथवा लघुपट बनवणे
८. गोवंश संवर्धन माध्यमातून कार्य करणे
९. ओसाड शेती चा वापर करून शेतकऱयांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणे
१०. लहान अथवा गुणी कलाकारांचे टॅलेंट ओळखून त्यांना पुढील क्षेत्रात जाण्यासाठी मदत करणे
११. परिसरातील गावे १०० टक्के साक्षर करणे


आपला स्वागतोत्सुक,
जितेंद्र गोर्ले
अध्यक्ष - निर्धार फाऊंडेशन बासे
९२०९२२८४७८/८००७४५४३४७

Popular Business in bhiwandi By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.