Shri Swami samarth annachatra Mandal. Akkalkot

Shri Swami samarth annachatra Mandal. Akkalkot

1268 13 Charity Organization

9370427043 sabhasad@swamiannacchatra.com www.swamiannacchatra.org

Shri swami samarth annacchatra mandal trust, Akalkot, India - 413216

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

13 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Shri Swami samarth annachatra Mandal. Akkalkot in Shri swami samarth annacchatra mandal trust, Akalkot

अन्न हे परब्रह्म आहे’ ‘अन्नदान सर्व श्रेष्ठ दान’ असे म्हटले आहे. त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खूप मोठी आहे. अन्नग्रहणाने क्षुधा शमते, अन्नामध्ये साक्षात ईश्वराचा वास असतो, म्हणून अन्न हे परब्रह्म आहे त्यामुळे ह्या महाप्रसादरुपी अन्न सेवनाने मनुष्य तृप्त होतो, एकप्रकारचे मानसिक समाधान लाभते हे अचूक हेरून वर सांगितल्याप्रमाणे १९८८ च्या गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर सन्मा.जन्मेजय भोसले महाराजांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना करून स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या परगावच्या स्वामी भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था केली. सध्या या अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस १५,००० ते २०,००० च्या वर परगावचे स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात. या ठिकाणी दैनदिन दोन्ही वेळेस स्वामी भक्तांना मोफत महाप्रसाद (मोफत पूर्ण भोजन) दिला जातो. सध्याच्या महाप्रसादगृहात एका वेळेस १००० स्वामी भक्त महाप्रसाद घरतील अशी बैठक व्यवस्था आहे. गर्दीच्या वेळेस महाप्रसादगृह व त्यालगतच्या बाहेरील शेडमध्ये महाप्रसाद दिला जातो. त्यावेळेस एकावेळेस अडीच हजार स्वामी भक्त महाप्रसाद घेऊ शकतात. महाप्रसादाचा दररोजचा खर्च ४ ते ५ लाख रुपये इतका आहे. सदरचा महाप्रसाद मोफत असल्याने कसल्याच प्रकारचे मुल्य त्यासाठी आकारले जात नाही. परगावच्या स्वामी भक्तांना अन्नछत्र व्हावे हि स्वामी समर्थांची इच्छा आहे. त्यामुळे हो अविरत चालणार हि भावना येथील सेवेकर्यात आहे. येथे स्वेच्छा दान असल्याने स्वामीभक्त हे या स्वामीकार्यात आपले सुध्दा योगदान असावे यासाठी पैशांच्या स्वरुपात किंवा धान्याच्या स्वरुपात अथवा वस्तुरूपात देणगी देतात ह्या मिळणाऱ्या देणग्यावरच हो अन्नछत्र चालते असा दृढ विश्वास समस्त सेवेकर्यांना आहे.
अन्नछत्र हे दुपारी १२ ते ३ आणि रात्री ८.३० १ या वेळेत सुरु असते. गर्दीच्या वेळेस किंवा उत्सवाचे दिवशी हे अन्नछत्र अहोरात्र सुरु असते. येथे आलेला भक्त विन्मुख होऊन जात नाही. हे या अन्नछ्त्राचे विशेष आहे. महाप्रसादासाठी सर्व स्वामी भक्त बंधू –भागीनिंना प्रतीक्षा गृहातून रांगेतून सोडले जाते. त्यामुळे धक्काबुक्की किंवा गोंधळ होत नाही.
महाप्रसादासाठी लागणारा भाजीपाला दररोज सकाळी भाजीपाला मंडईतून खरेदी केला जातो. यासाठी ठराविक सेवेकरी नेमले आहेत. महाप्रसाद करण्यासाठी ६ आचारी असून मुख्य आचारी श्री.धानप्पा उमदी हे आहेत. हे सर्व आचारी मनापासून सेवा करतात. त्यांना नाममात्र मानधन दिले जाते. गर्दीच्या वेळेस किंवा उत्सवाचे वेळेस अगदी अल्पावधीतच पाच-पन्नास हजार स्वामी भक्तांचा महाप्रसाद तयार होतो. महाप्रसादासाठी वापरण्यात येणारे साहित्य उदा-गहू, तांदूळ, तेल, मसाले इ. चांगल्या दर्जाचे असते. महाप्रसादासाठी कांदा, लसून याचा वापर अजिबात केला जात नाही. त्यामुळे महाप्रसाद अतिशय स्वादिष्ट तयार होतो. अन्नछत्राचे स्थापनेपासून आजतागायत महाप्रसादाची अवीट अशी गोडी आहे. हे या महाप्रसादाचे वैशिष्ट्य होय. शिरा किंवा गव्हाची खीर किंवा सांजा (लापशी), एक भाजी, आमटी, चपाती आणि मसालेभात असा महाप्रसादाचा थाट असतो. रात्री साधा महाप्रसाद म्हणजे भात, भाजी, पोळी (चपाती) आणि आमटी असा असतो. उत्सवकाळात महाप्रसाद पंचपक्वान्नाचा असतो. दुपारी ११.४५ वा स्वामींना महानैवेद्य दाखवून व महाआरती होऊन संकल्प झाल्यानंतर महाप्रसाद वाटपास प्रारंभ होतो.

Popular Business in akalkot By 5ndspot

© 2024 5ndspot. All rights reserved.